वरणगाव शहरातील पिसाळलेल्या कुत्र्यांचा बंदोबस्त करा


नगरपरीषद मुख्याधिकारी यांना शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे निवेदन

वरणगाव : शहरात गेल्या काही दिवसांपासून पिसाळलेल्या कुत्र्यांचा हैदोस वाढला आहे. या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा. अशी मागणी बुधवारी नगरपरीषद मुख्याधिकारी श्यामकुमार गोसावी यांना वरणगाव शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे निवेदन देऊन करण्यात आली.

मोकाट कुत्र्यांमुळे पसरली भीती
दोन दिवसापूर्वी नदी पात्रात पायी चालणार्‍या चार ते पाच नागरीकांना या मोकाट कुत्र्यांनी चावा घेतला. लहान मुले खेळत असताना तसेच पायी चालणार्‍या आणि दुचाकीस्वराच्या अंगावर हे कुत्रे धावून जातात. कुत्रे अंगावर आल्याने नागरीक भांबऊन जातात. बस स्थानकापासून गावात जाताना रात्री बेरात्री रामपेठ, प्रतिभा नगर कॉर्नर, नदी पात्र, मटण मार्केट, स्मशान भूमी परिसर, गांधी चौक, जुनी भाजी साथ, सावकार गल्ली, मोठी होळी, रावजी बॉ परिसर, अकसा नगर तसेच नवीन कॉलनी परीसरात कुत्र्यांचे टोळके बसलेले असते शिवाय त्यांच्याजवळून कुणी गेल्यास त्यांच्या अंगावर चावा घेण्यासाठी कुत्रे धावून जातात. अशा मोकाट कुत्र्यांपासून शहरातील नागरीकांना धोका असल्याने पिसाळलेल्या कुत्र्यांचा बंदोबस्त करून मानवाचे रक्षण करा, अश्या मागणीचे निवेदन शहर राष्ट्रवादीतर्फे देण्यात आले.


यांची होती उपस्थिती
निवेदनावर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र चौधरी, शहराध्यक्ष संतोष माळी, तालुकाध्यक्ष दीपक मराठे, जिल्हा युवक उपाध्यक्ष वाय.आर. पाटील, ओबीसी सेल तालुकाध्यक्ष मनोज कोलते, माजी नगरसेवक रवींद्र सोनवणे, गणेश चौधरी, समाधान चौधरी, रीजवान शेख, एहसान अहमद, माजी नगराध्यक्ष अरुणा इंगळे, माजी नगरसेवक सुधाकर जावळे, महेश सोनवणे, जुबेर शेख, आय काँग्रेसचे शहराध्यक्ष अशपाक काझी, अझर सैय्यद, जुनेद सैय्यद, मुस्तकीन मण्यार, नरबेग इम्रान बेग, सादाब शेख, अकील सैयद, राजेश इंगळे यांच्या स्वाक्षरी आहे.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !