भुसावळात उद्या रक्तदान शिबिर


भुसावळ : शिवसेनाप्रमुख स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त शहरातील रेल्वे दवाखान्यात शुक्रवार, 29 रोजी सकाळी 10 ते 5 दरम्यान भव्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. शिवसेना पक्षप्रमुख, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने व केंद्रीय अध्यक्ष माजी खासदार आनंदराव अडसुळ यांच्या अनुमतीने व केंद्रीय कमेटीच्या सूचनेने व भुसावळ डिवीजन पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या सहकार्याने या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. जास्तीत-जास्त रक्तदात्यांसह कामगारांनी रक्तदान करावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. उद्घाटन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याहस्ते होईल. शिबिराकामी गोलवलकर स्वयंसेवी रक्तपेढी, जळगाव यांचे सहकार्य लाभणार आहे.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !