भुसावळात 30 रोजी ‘लॉक अनलॉक’ एकांकिका


भुसावळ : शहरातील उत्कर्ष कलाविष्कार संस्थेतर्फे नाहाटा महाविद्यालयाशेजारील ताप्ती पब्लिक स्कूलचे अ‍ॅम्पी थिएटरमध्ये शनिवार, 30 रोजी ‘लॉक अनलॉक’ एकांकिकेचे सादरीकरण केले जाणार आहे. लेखन अनिल कोष्टी तर दिग्दर्शन धनश्री जोशी यांनी केले असून संगीत शुभम पवार तसेच प्रकाश योजना प्रथमेश जोशी यांनी केली आहे. या एकांकिकेत दर्शन गुजराथी, उमेश गोरधे, वैष्णवी तांबट, आदेश साळुंखे, केयुर कुलकर्णी, चेतन नायदे, धनश्री जोशी आदींचा सहभाग आहे. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर नियमांचे पालन करून मोजक्याच प्रेक्षकांना प्रवेश दिला जाणार असल्याचे आयोजकांनी कळवले आहे.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !