दोषींवर व्हावी कारवाई : खासदार रक्षा खडसे


मुक्ताईनगर : भाजपाच्या अधिकृत वेबसाईटवर रावेर मतदारसंघातील भाजपा खासदार रक्षा खडसे यांच्याविषयी आक्षेपार्ह मजकूर उमटल्यानंतर भाजपावर टिकेची झोड उठली होती. या संदर्भात लागलीच दखल घेवून तो मजकूर हटवण्यातदेखील आला. या संदर्भात खासदार रक्षा खडसे म्हणाल्या की, झालेला प्रकार हा वाईट आणि विचित्र होता. एका महिलेच्या संदर्भात कोणी विरोधक किंवा सत्ताधारी असेल अथवा तिथे कुणीही असेल त्यांनी हे व्हायरल करण्याची कोणतीही गरज नव्हती. या प्रकरणावर पोलिस चौकशी करत आहे, पक्ष सुद्धा यावर खुलासा करणार आहे. जे कोणी दोषी असतील त्यावर नक्की कारवाई केली पाहिजे, असेही रक्षा खडसे म्हणाल्या.

चावटपणा करणार्‍याला आत टाका- शिवसेनेचे नेते गुलाबराव पाटील
दरम्यान असा चावटपणा करणार्‍याला जेलमध्ये टाकायला हवं, अशी संतप्त प्रतिक्रिया शिवसेनेचे नेते आणि मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली आहे.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !