मुक्ताईनगर तालुक्यात 31 ग्रामपंचायतीवर ‘महिलाराज’
मुक्ताईनगर : तालुक्यातील 61 ग्रामपंचायतींच्या निवडणुका नुकत्याच आटोपल्यानंतर सरपंचपद आरक्षणासाठी गुरुवारी तहसील कार्यालयात प्रांताधिकारी रामसिंग सुलाने व तहसीलदार श्वेता संचेती यांच्या उपस्थित आरक्षण सोडत काढण्यात आली. 61 पैकी 31 ग्रामपंचायतीवर महिलाराज राहणार आहे.
जाहीर झालेले आरक्षण असे-
सर्वसाधारण- चिखली, जोंधनखेडा, सारोळा, चारठाणे, कर्की, नांदवेल, माळेगाव, कोथर्ळीें पिंप्रीपंचम, पिंप्री अकाराउत, टाकळी, बोदवड.

सर्वसाधारण महिला राखीव- राजुरा, हिवरे, पंचाणे, वायला, नायगाव, निमखेडी बु.॥, पुरनाड, पातोंडी, माणेगाव, मेहुण, बोरखेडा, शेमळदे
नागरीकांचा मागास प्रवर्ग- नरवेल, चिंचोल, मेंढोदे, सतोड, चिंचखेडा बु.॥, कुर्हा, इच्छापूर, हलखेडा
नागरीकांचा मागास प्रवर्ग महिला राखीव- घोडसगाव, मेळसांगवे, चिंचखेडा खुर्द, पिंप्राळा, कोर्हाळा, भोटा, सालबर्डी, महालखेडा, पिंप्रीनांदू
अनुसूचित जाती- धामणगाव, काकोडा, तरोडा, चांगदेव, निमखेडी खुर्द
अनुसूचित जाती (महिला राखीव)- अंतुर्ली, दुई, पारंबी, थेरोळा
अनुसूचित जमाती- खामखेडा, लोहारखेडा, वढवे, सुळे, बेलसवाडी
अनुसूचित जमाती (महिला राखीव)- हरताळे, वडोदरा, धामणदे, रुईखेडा, सुकळी, उचंदे


