लाचखोर वरीष्ठ सहाय्यकाची पोलिस कोठडीत रवानगी


यावल : सेवानिवृत्त मुख्याध्यापकाकडून सेवानिवृत्ती वेतन निश्‍चिती व उपदान मिळण्यासाठी वरीष्ठांकडे अहवाल सादर करण्याच्या मोबदल्यात तीन हजारांची लाच मागणार्‍या यावल पंचायत समितीतील शिक्षण विभागाचे वरिष्ठ सहाय्यक सिकंदर सायबु तडवी (56) यांना जळगाव एसीबीच्या पथकाने बुधवारी लाच मागणी प्रकरणी अटक केली होती. आरोपीला गुरुवारी भुसावळ अतिरीक्त सत्र न्यायालयात हजर केले असता 1 फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली.

आरोपीला 1 पर्यंत पोलिस कोठडी
फैजपूर येथील 62 वर्षीय तक्रारदार सेवानिवृत्त मुख्याध्यापक आहेत. तक्रारदार हे जिल्हा परिषदेच्या शाळेतून मुख्याध्यापक पदावरून सेवानिवृत्त झाल्यानंतर कायमस्वरूपी सेवानिवृत्ती वेतन निश्‍चिती व उपदान मिळण्यासाठी वरिष्ठांकडे अहवाल सादर करण्याच्या मोबदल्यात आरोपी यांनी पंचासमक्ष 19 रोजी तीन हजारांची यावल पंचायत समिती कार्यालय परिसरात लाच मागितली होती. त्याबाबत एसीबीकडे पुरावे आल्यानंतर बुधवारी आरोपीला अटक करून त्याच्याविरुद्ध यावल पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, गुरुवारी भुसावळ न्यायालयात आरोपीला हजर केल्यानंतर न्यायालयाने 1 फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. तपास एसीबीचे पोलीस उपअधीक्षक गोपाळ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.






मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !