यावल तालुक्यात 32 गावांमध्ये महिलांच्या हाती सत्ता


यावल : तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या 63 गावांच्या ग्रामपंचायतीच्या सरपंच आरक्षणासाठी यावल तहसीलदार महेश पवार यांच्या अध्यक्षतेखाली तहसील कार्यालयात आरक्षण सोडत काढण्यात आली. अनुसूचित जातीसाठी आरक्षित आठ जागा करण्यात आल्यात. त्यात मनवेल, शिरसाळ, दहिगाव, कासवे, कोसगाव, कोरपावली, विरोदा, वर्डी खुर्द तसेच अनुसूचित जमातीसाठी 25 गावे आरक्षित करण्यात आली. त्यात भालोद, चुंचाळे, कासारखेडा, शिरागड, आडगाव, नायगाव ,डांभुर्णी, गिरडगाव, चिंचोली, दुसखेडे, अंजाळे, वडोदा प्र.सावदा, डोंगरकठोरा, विरावली, आमोदे, किनगाव खुर्द, सांगवी बुद्रुक, निमगाव, अट्रावल, हिंगोणा, चिखली खुर्द, उंटावद, महेलखेडी तसेच नागरीकांचा मागास प्रवर्गासाठी राजोरा, बोरखेडा बुद्रुक, पाडळसे, चिखली बुद्रुक, नावरे, मोहराळे, बोरावल खुर्द, किनगाव बुद्रुक, वनोली ,थोरगव्हाण खुर्द, सावखेडा सिम, साकळी, बामणोद, डोणगाव, सांगवी खुर्द आणि सर्वसाधारण प्रवर्गासाठी टाकरखेडा, न्हावी प्र.अडावद, पिंपरुड, पिळोदे बुद्रुक, बोराडे, बोरावल बुद्रुक, मारुळ, म्हैसवाडी, वढोदे प्र., यावल, हंबर्डी, चितोडे, पिंप्री या गावांसाठी आरक्षण काढण्यात आले.

32 गावांमध्ये महिलांना मिळणार संधी
32 गावांसाठी 50 टक्के महिलांसाठी आरक्षण सोडत फैजपूर विभागाचे प्रांताधिकारी कैलास कडलग यांच्या अध्यक्षतेखाली काढण्यात आली. अनुसूचित जाती महिला स्त्री राखीवसाठी मनवेल, शिरसाळ, कासवे, वड्री खुर्द तर अनुसूचित जमाती आरक्षणासाठी 13 महिला राखीव करण्यात आल्यात. त्यात कासारखेडा, डांभूर्णी, चिंचोली, आमोदे, सातोड, शिरागड, नायगाव, विरावली, किनगाव खुर्द ,निमगाव, हिंगोणे, चिखली खुर्द, महेलखेडी, नागरीकांचा मागास प्रवर्ग महिला या आरक्षणासाठी राजोरा, सांगवी खुर्द, मोहराळे, थोरगव्हाण, पाडळसे, पिळोदे खुर्द, किनगाव बुद्रुक, सावखेडासीम, सर्वसाधारण प्रवर्गासाठी महिला टाकरखेडा, बोराडे, बोरावल बुद्रुक, पिंपरूड , भालशीव, हंबर्डी, पिळोदे बु॥ या गावांसाठी महिलांसाठी आरक्षित करण्यात आले.






मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !