रावेर तालुक्यात 40 ग्रामपंचायतींची धुरा ‘स्त्री शक्तीच्या हाती’


रावेर : तालुक्यातील 82 ग्रामपंचायतीसाठी तहसील कार्यालयात गुरुवारी सकाळी प्रभारी तहसीलदार संजय तायडे यांच्या उपस्थितीत आरक्षण काढण्यात आले तर दुपारी प्रांताधिकारी कैलास कडलग यांच्या उपस्थितीत महिला आरक्षण काढण्यात आले. तालुक्यातील 40 ग्रामपंचायतींमध्ये महिलांना संधी मिळणार आहे. तालुक्यातील एकूण 95 ग्रामपंचायतींपैकी अनुसूचित क्षेत्रातील 13 ग्रामपंचायती वगळता 82 ग्रामपंचायतीचे आरक्षण काढण्यात आले.

40 ग्रामपंचायतीत महिलांना मिळणार संधी
अनु.जाती महिला- केर्‍हाळे बु.॥, तांदलवाडी, कोचुर बु.॥, मांगलवाडी, रमजीपूर, थोरगव्हाण


अनु.जमाती महिला- अजनाड, मोरगाव खुर्द, निंभोरा बु.॥, खिरवड, अटवाडे, पातोंडी, धूरखेड, विवरा खुर्द, सिंगत, मस्कावदसीम

नामाप्र महिला- खिरोदा प्र.यावल, निरूळ, गहूखेडा, केर्‍हाळा खुर्द, रसलपूर, कांडवेल, तामसवाडी ग्रुप, खिरोदा प्र.रावेर, खानापूर, पाडळे खुर्द, उदळी बु.॥

सर्वसाधारण महिला- बक्षीपूर, मस्कावद बु.॥, सुलवाडी, नेहते, भाटखेडा, गौरखेडा, बलवाडी, खिर्डी बु.॥, दसनूर, वाघोदे बु.॥, पूनखेडा, कर्जोद





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !