सावद्यात घरफोडी : 70 हजारांचा एैवज लांबवला
सावदा : शहरातील डॉक्टर दाम्पत्याच्या घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी रोकडसह 70 हजारांचा ऐवज लांबवल्याची घटना गुरुवारी उघडकीस आली. पंजाब नॅशनल बँकमागील रहिवासी डॉ.चेतन कोळंबे व त्यांच्या पत्नी कामानिमित्त बाहेरगावी गेल्याने 26 जानेवारीच्या सकाळी सहा ते 27 रोजीच्या रात्री 11 दरम्यान घराला कुलूप असल्याने चोरट्यांनी संधी साधत बेडरूममधील गोदरेज कपाटातून 30 हजारांची रोकड तसेच 40 हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने लांबवली. डॉक्टर दाम्पत्य गावाहून परतल्यानंतर ही घटना उघडकीस आली. तपास सहाय्यक निरीक्षक देविदास इंगोले यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार महेमुद शहा, वसीम पठाण, सुरेश अढाईंगे करीत आहेत.


