भुसावळ तालुक्यात प्रस्थापितांना धक्का तर अनेक ठिकाणी महिलाराज
भुसावळ विभागातील ग्रामपंचायतीच्या सरपंच पदासाठी निघाली आरक्षण सोडत : अनेक इच्छूकांना बसला धक्का
भुसावळ : भुसावळसह यावल, रावेर, मुक्ताईनगर व बोदवड ग्रामपंचायतींची निवडणूक आटोपल्यानंतर गुरुवारी सरपंच पद आरक्षणासाठी सोडत काढण्यात आली. सोडतीत अनेकांना लॉटरी लागली तर काही ठिकाणी प्रस्थापितांना धक्काकी बसला तर अनेक ग्रामपंचायतींवर आता महिलाराजदेखील अवतरणार असल्याने समाधान व्यक्त करण्यात आले. गावकारभार्याच्या खुर्चीची आस लागलेल्यांचादेखील हिरमोड झाल्याचे दिसून आले
भुसावळ तालुक्यात बदलणार समीकरणे
भुसावळ : तालुक्यातील 39 ग्रामपंचायतींच्या सरपंच पदासाठी गुरूवारी पंचायत समिती सभागृहात आरक्षण सोडत काढण्यात आली. तहसीलदार दीपक धीवरे अध्यक्षस्थानी होते. गटविकास अधिकारी विलास भाटकर यांच्यासह राजकीय मंडळी उपस्थित होती. सभापती मनीषा पाटील, उपसभापती वंदना उन्हाळे, विजय सुरवाडे, प्रीती पाटील आदी उपस्थित होत्या. यावेळी 2022 व 2023 मध्ये मुदत संपत असलेल्या ग्राम पंचायतीच्या सरपंच पदाचेही आरक्षण काढण्यात आले.

अनुसूचित जाती (एस.सी.) सरपंच पद आरक्षण असे
तळवेल, मोंढाळे, मण्यारखेडा, शिंदी, जाडगाव कठोरे बुद्रूक, ओझरखेडा
साकरी
अनुसूचित जमाती (एस.टी.)- वराडसीम-जोगलखोरी, मांडवेदिगर-भिलमळी, साकेगाव, पिंपळगाव बुद्रूक, वेल्हाळे, कंडारी
नागरीकांचा मागास प्रवर्ग (ओबीसी)- पिंप्रीसेकम, सुसरी, वांजोळा, जोगलखेडा, फुलगाव, फेकरी, कठोरा खुर्द, कन्हाळे बुद्रूक, कुर्हे प्र.न., पिंपळगाव खुर्द, काहुरखेडा
सर्वसाधारण प्रवर्गासाठी (जनरल)- हतनूर, अंजनसोंडे, गोजोरे, बेलव्हाय
कन्हाळे खुर्द, सुनसगाव, टहाकळी, दर्यापूर, किन्ही, खंडाळे, आचेगाव, बोहर्डी बुद्रूक, खडके, चोरवड
आज निघणार महिलांसाठी आरक्षण
शुक्रवारी सकाळी 11 वाजता पंचायत समितीमध्ये तालुक्यातील ग्रामपंचायतीमध्ये महिलाचे आरक्षण काढले जाणार आहे. प्रांताधिकारी रामसिंग सुलाणे यांच्या अध्यक्षतेखाली हे आरक्षण काढले जाणार आहे.


