वरणगाव नगरपरीषदेवर भाजपाचीच सत्ता येणार : खासदार रक्षा खडसे
वरणगाव : वरणगाव भारतीय जनता पार्टी शहराच्या वतीने शिरसाळा येथील हनुमंत रायला साकडे घालण्यासाठी शेकडो कार्यकर्ते रवाना झाले. 35 किलोमीटर पायी संकल्प पदयात्रा भाजपने काढली. यावेळी खासदार रक्षा खडसे यांनी तळवेल फाटा बोहर्डीपर्यंत पायी चालून पदयात्रेत सहभाग नोंदवला. खासदार खडसे म्हणाल्या की, वरणगाव नगरपरीषदेवर भाजपाची सत्ता बसविण्यासाठी माझ्याही शुभेच्छा असून प्रलंबित विकास कामे मार्गी लागल्या पाहिजे तसेच पाणीपुरवठा योजनेवरील स्थगिती भाजपाने वेळोवेळी केलेल्या आंदोलनामुळे सरकारला उठवावी लागली हे यश भारतीय जनता पार्टीचे आहे.
यांची होती उपस्थिती
यावेळी माजी नगराध्यक्ष सुनील काळे, भाजपा शहराध्यक्ष सुनील माळी, गोलू राणे, कुंदन माळी, मनोहर सराफ, संदीप भोई, आकाश निमकर, तेजस जैन, शंकर पवार, हितेश चौधरी, मिलिंद भैसे, आकाश मराठे, गजानन वाघ, कमलाकर मराठे, भाऊलाल टिंटोरे, ज्ञानेश्वर घाटोळे, संदीप माळी, सचिन कुंभार, दादू शिवरामे, संतोष नारखेडे, गजानन वंजारी, नथ्थू पवार, कामगार नेते मिलिंद मेढे, जय चांदणे, पप्पू ठाकरे, प्रताप दिव्यवीर, योगेश माळी यांच्यासह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.



