मुक्ताईनगरात एमआयडीसी जागेची आमदारांकडून पाहणी


मुक्ताईनगर : बोदवड व मुक्ताईनगर तालुक्यासह मुक्ताईनगर मतदार संघासाठी महत्त्वाकांक्षी प्रकल्प असणार्‍या औद्योगिक वसाहत (एमआयडीसी) ची निर्मिती व्हावी हे शिवसेना जिल्हाप्रमुख तथा आमदार चंद्रकांत पाटील यांचे मोठे स्वप्न असून .यासाठी आमदार पाटील यांनी अधिवेशनात या मुद्याला तारांकित करून व पुढे मंजुरी मिळण्यासाठी सतत पाठपुरावा सुरू ठेवलेला आहे. गेल्याच महिन्यात मुक्ताईनगर येथे औद्योगिक वसाहत निर्मितीबाबतीत मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्यासुचनेनुसार राज्याचे औद्योगिक मंत्री सुभाष देसाई, जळगांव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील तसेच आमदार पाटील व औद्योगिक वसाहतविभागाचे सचिव तसेच महत्वपूर्ण अधिकार्‍यांची महत्वपूर्ण बैठक पार पडली होती. त्यानुसार, गुरुवार, 28 जानेवारी रोजी मुक्ताईनगर येथील सारोळा व हरताळा परीसरातील जमिनीची पाहणी करण्यासाठी औद्योगीक वसाहतीचे अधिकारी उपअभियंता एम.एस.पाटील, सहायक अभियंता बी.यु.पाटील, सर्वेअर एकनाथ ठाकरे यांनी प्रकल्पाचा पूर्ण आढावा घेत जागेची निश्चिती व स्थळ निरीक्षण केले. यावेळीराष्ट्रवादीचे जेष्ठ नेते अनंतराव देशमुख, संजय मराठे, स्वीय सहायक प्रवीण चौधरी, शुभम शर्मा व इतर ग्रामस्थ उपस्थित होते .

200 हेक्टर जमीन होणार संपादीत
एमआयडीसीसाठी अनुकूल वातावरण, नाडगाव रेल्वे स्टेशन, विजेची व्यवस्था, मुबलक पाण्याची व्यवस्था तसेच इंदोर-औरंगाबाद महामार्ग , मुंबई -नागपूर हायवे अशी उत्तम भौगोलिक परिस्थिती असल्याचे अहवालात नमूद असून सुमारे 200 हेक्टर जमीन संपादीत होणार असल्याचे सांगण्यात आले.






मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !