14 विशेष उत्सव विशेष गाड्यांना मुदतवाढ
भुसावळ : रेल्वे प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी 14 विशेष उत्सव विशेष गाड्यांना मुदतवाढ देण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे.
या गाड्यांना मिळाली मुदतवाढ
अप 06067 चेन्नई एगमोर-जोधपूर ही गाडी 6 फेब्रुवार ते 27 मार्चपर्यंत धावणार आहे. डाऊन 06068 जोधपूर-चेन्नई एगमोर ही गाडी 8 फेब्रुवारी ते 29 मार्चपर्यंत धावणार आहे. या गाडीला बडनेरा, अकोला, शेगाव, भुसावळ, जळगाव स्थानकावर थांबा देण्यात आला आहे. डाऊन 06733 रामेश्वरम-ओखा एकस्प्रेस 5 फेबु्रवारी ते 26 मार्चपर्यंत धावणार आहे. अप 06734 ओखा-रामेश्वरम एक्स्प्रेस 9 फेब्रुवारी ते 30 मार्चपर्यंत धावणार आहे. या गाडीला मनमाड व जळगाव स्थानकावर थांबा देण्यात आला आहे. अप 03259 पटना-मुंबई एक्स्प्रेस 31 जानेवारी ते 31 मार्च दरम्यान दर रविवारी व बुधवारी धावणार आहे. डाऊन 03260 मुंबई-पटना एक्स्प्रेस 2 फेब्रुवारी ते 2 एप्रिलदरम्यान दर मंगळवारी व शुक्रवारी धावेल तर भुसावळ स्थानकावर या गाडीला थांबा देण्यात आला आहे. अप 02545 रक्सोल ते लोकमान्य टिळक टर्मिनस एक्स्प्रेस 28 जानेवारी ते 25 मार्च दरम्यान दर गुरुवारी धावणार आहे. डाऊन 02546 लोकमान्य टिळक टर्मिनस ते रक्सौल एक्स्प्रेस 30 जानेवारी ते 27 मार्चदरम्यान दर शनिवारी धावणार आहे. या गाडीला खंडवा, भुसावळ, मनमाड स्थानकावर थांबा देण्यात आला आहे. अप 05547 रक्सौल-लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस 25 जानेवारी ते 29 मार्च दरम्यान दर सोमवारी धावणार आहे. डाऊन 05548 लोकमान्य टिळक टर्मिनस ते रक्सौल एक्स्प्रेस 27 जानेवारी ते 31 मार्च दरम्यान दर बुधवारी धावेल. या गाडीला खंडवा, भुसावळ व मनमाड स्थानकावर थांबा देण्यात आला आहे. अप 05267 रक्सौल-लोकमान्य टिळक टर्मिनस एक्स्प्रेस 30 जानेवारी ते 27 मार्चदरम्यान दर शनिवारी धावेल. डाऊन 05268 लोकमान्य टिळक टर्मिनस ते रक्सौल एक्स्प्रेस 1 फेब्रुवारी ते 29 मार्च दरम्यान दर सोमवारी धावणार आहे. या गाडीला खंडवा, भुसावळ, नाशिक स्थानकावर थांबा देण्यात आला आहे. अप 05563 जयनगर-उधना एक्स्प्रेस 28 जानेवारी ते 25 मार्चदम्यान दर गुरुवारी धावणार आहे. डाऊन 05564 उधना-जयनगर एक्स्प्रेस 31 जानेवारी ते 28 मार्च दरम्यान दर रविवारी धावणार आहे. या गाडीला खंडवा, भुसावळ, जळगाव स्थानकावर थांबा देण्यात आला आहे. केवळ आरक्षित तिकिट असलेल्या प्रवाश्यांनाच या विशेष गाड्यांमध्ये चढण्याची परवानगी देण्यात येईल तसेच प्रवाशांना बोर्डिंग, प्रवासादरम्यान आणि गंतव्यस्थानाच्या वेळी कोविड -19 शी संबंधित सर्व निकषांचे पालन करावे लागणार आहे.



