भुसावळ विभागातील 38 कर्मचारी सेवानिवृत्त
भुसावळ : रेल्वेच्या प्रदीर्घ सेवेनंतर भुसावळ रेल्वे विभागातून 29 रोजी 38 रेल्वे कर्मचारी सेवानिवृत्त झाले. सेवानिवृत कर्मचार्यांना रेल्वेतर्फे तत्काळ 10 कोटी पाच लाख 75 हजार 650 रुपये त्यांच्या खात्यात वर्ग करण्यात आले. या सेवानिवृत्ती संदर्भात रेल्वे द्वारा व्हर्चुअल ऑनलाईन सेवानिवृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
कर्मचार्यांना व्हर्चुअल कार्यक्रमाद्वारे निरोप
कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे समारंभाचे आयोजन न करता सेवानिवृत्त कर्मचार्यांचा यथोचीत सन्मान व्हर्चुअल ऑनलाईन पद्धत्तीने करण्यात आला. रेल्वे प्रतिनिधी म्हणून खंडवा, अकोला, भुसावळ, पाचोरा, चाळीसगाव, बडनेरा, अमरावती आदी ठिकाणी कल्याण निरीक्षकांनी जाऊन पी.पी.ओ.फोल्डर दिलेत. सेवानिवृत्तीबद्दल कर्मचार्यांना विभागीय रेल्वे व्यवस्थापक विवेककुमार गुप्ता, अपर विभागीय रेल्वे व्यवस्थापक मनोजकुमार सिन्हा, वरीष्ठ विभागीय कार्मिक अधिकारी एन.डी.गांगुर्डे यांनी सेवानिवृत्तीबद्दल मार्गदर्शन केले. आभार सहाय्यक कार्मिक अधिकारी विरेंद्र वडनेरे यांनी केले. यशस्वितेसाठी सेटलमेंट आणि लेखा विभागातील तसेच सर्व कल्याण निरीक्षक व कर्मचारी आदींनी परीश्रम घेतले.



