प्रेम, एकता, सुख-दुःखात साथ हीच सुखी जीवनाची गुरुकिल्ली


शास्त्री भक्तीकिशोरदास : भालोदच्या चौधरी परीवाराचा नाशिकमध्ये रंगला सत्संग स्नेह मेळावा

सावदा (दीपक श्रावगे) : सध्या आपण बघतोय कुटुंबे लहान होत चाललीय.एकत्र कुटुंब पद्धती लोप पावत चालली आहे. त्यातच नोकरी, व्यवसाय निमित्त आपली गावे सोडून बाहेर अर्थात शहराकडे माणसे जात आहेत. ग्रामीण भागातील घरे ओस पडताना दिसत आहे. यावर एकच उपाय तो म्हणजे सर्व परीवार, नाती-गोती यांच्यात संवाद घडावा. त्यासाठी सर्वांनी अधून-मधून प्रत्यक्ष एकत्र येऊन संवाद करावा व नाळ जुळून रहावी यासाठी स्नेह संमेलनाचे निमित्त हे हवेच.असेच एक स्नेह संमेलन मेळावा नाशिक येथे रंगले. ते म्हणजे भलोद येथील चौधरी परीवाराचे आणि यासाठी खास पुढाकार घेतला तो याच परीवारातील संत बनलेल्या श्री स्वामी आणि गुरुकुलचे उपाध्यक्ष श्री भक्ती किशोरदास यांनी. यासाठी खास निमित्त साधले गेले ते चौधरी परीवारातील डिगंबर झिपरू चौधरी व तुळसाबाई डिगंबर चौधरी यांचे पुण्यस्मरण.

संवादासह स्नेहाने परीवाराचा सर्वांगीण विकास
शास्त्री भक्ती किशोरदास म्हणाले की, परीवार कोणताही असो त्यात कायम संवाद, एकता, स्नेह, आनंद असेल तर तो परीवार हा आपला सर्वांगीण विकास करू शकतो. आजच्या अत्याधुनिक व धावपळीच्या युगात प्रत्येक माणूस पैसा व प्रतिष्ठेच्या आहारी जात असल्यानं आपले कुटुंब, आपली नाती व आपले स्नेही या सर्वांचा त्याला विसर पडू लागला आहे. पारीवारीक सदस्यांमध्ये संभाषणं कमी होत असल्याने नात्यात दुरावा निर्माण होऊ लागला. नात्यातील प्रेमाचा ओलावा कुठे तरी कमी होताना दिसत आहे.दुःखाच्या प्रसंगी एकटे पडल्याची भावना निर्माण होत आहे. केवळ मोबाईल मध्येच सुख-शांती शोधण्याचे व्यर्थ प्रयास होऊ लागले आहेत पण या स्नेह संमेलन मुळे नक्कीच स्नेह, एकतेचा व आनंदाचा सोहळा सर्वांसाठी प्रेरणादायी ठरेल.


आपल्या माणसांना घडविण्याइतके पुण्य नाही
भक्तीकिशोरदास म्हणाले की, एखाद्या गरीब कुटुंबात जर आजार, उपचार, किंवा शिक्षणासाठी गरज भासली तर ती करण्यासाठीही पुढाकार घेण्याचे ठरले. आपल्या माणसांना जगविणे, घडविणे यासारखे दुसरे पुण्य कोणतेच नाही, असे शास्त्री यांनी सांगितले. या कार्यक्रमात मनोगत, लहान मुले व मुलींचे भाषण व गीत/कविता सादरीकरण, गरबा, स्नेहभोजनाचा कार्यक्रम झाला. नोकरी व्यवसायानिमित्त दूर दूर गेलेले व फारसे एकत्र न येऊ शकणारे परीवारातील सदस्य हे एकत्र आल्याने सर्व आनंदी झाले. सूत्रसंचालन सलोनी चौधरी व मानसी चौधरी यांनी केले.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !