पंचशील नगरातील समस्या आठ दिवसात सुटणार


आरोग्य सभापती प्रा.दिनेश राठी : वंचित बहुजन संघटनेच्या पाठपुराव्याला यश

भुसावळ : शहरातील पंचशील नगरातील समस्या आठ दिवसात सोडवण्यात येतील, अशी ग्वाही नूतन आरोग्य सभापती प्रा.दिनेश राठी यांनी दिली. वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकार्‍यांनी समस्यांसंदर्भात आरोग्य सभापतींना दखल घेण्याची विनंती केली होती.

समस्यांमुळे नागरीकांचे आरोग्य धोक्यात
पंचशील नगरात घाणीचे साम्राज्य पसरले असून शौचालयाची स्थिती बिकट झाल्याने महिला वर्गाची कुचंबणा होत आहे. पिण्याचे पाणी मिळत नाही तसेच गटारीची स्वच्छता होत नाही अश्या एक ना अनेक समस्यांच्या चक्रव्युहात अडकलेल्या पंचशील नगरवासीयांना समस्यांच्या गर्तेतून बाहेर काढण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष विनोद सोनवणे यांच्यासह पदाधिकार्‍यांनी पुढाकार घेतला आहे. वंचितच्या तक्रारीनंतर पालिका मुख्याधिकारी यांनी भेट देवूनही समस्या कायम असल्याने जिल्हाध्यक्ष विनोद सोनवणे, जिल्हा महासचिव दिनेश ईखारे यांनी या प्रभागाच्या समस्या सोडवण्यासाठी नूतन आरोग्य सभापती प्रा.दिनेश राठी यांच्याकडे याबाबत गार्‍हाणे मांडल्यानंतर त्यांनी शनिवारी या भागात भेट देवून समस्यांची पाहणी केली. येत्या आठ दिवसांत सर्व समस्या सोडविण्याचे आश्वासन प्रा.राठीयांनी दिले. याप्रसंगी राम साळुंके, अरुण नरवाडे, अरुण तायडे, भीमराव तायडे, अनिकेत बिर्‍हाडे, देवदत्त मकासरे, अशोक इंगळे, बेबाताई बागुल, संदीप मैराळे सह नागरीक उपस्थित होते.






मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !