खडसेंनी पक्ष सोडल्यानंतरही भाजपाचा वाढला विस्तार
रावेरात भाजपाच्या बैठकीत डॉ.राजेंद्र फडके यांचा दावा
रावेर : भाजपा विचारांच्या सरपंचाच्या गळ्यात रुमाल टाकण्याचे काम काही लोक करीत असून पक्षात मी पणा केला म्हणून पक्ष सोडावा लागला. त्यांनी पक्ष सोडल्यामुळे भाजपाला काहीही फरक पडला नाही उलट भाजपाचा विस्तार होत असल्याचे म्हणत डॉ.राजेंद्र फडके पुन्हा माजी महसूल मंत्री एकनाथराव खडसे यांच्यावर निशाणा साधला. भाजपाची विस्तृत स्वरूपाची महत्वाची बैठक कृषी उपन्न बाजार समितीच्या हॉलमध्ये मंगळवारी झाली. यावेळी डॉ.फडके बोलत हेते.
केंद्राची कामे जनतेपर्यंत पोहोचवा
डॉ.फडके म्हणाले की, बुथ संपर्क अभियानामार्फत केंद्र सरकारच्या कामांची माहिती बूथ प्रमुखांनी जनतेपर्यंत पोहचवावी. गत विधानसभा निवडणुकीत रावेरात स्व.हरीभाऊ जावळे तर मुक्ताईनगरमधून अॅड.रोहिणी खडसेंचा पराभव जात, पैशांमुळे नव्हे तर भाजपा सरकारची कामे जनतेपर्यंत पोहोचली नाही म्हणून झाला. यातून धडका घेवून यापुढे केंद्र सरकारची कामे जनतेपर्यंत पोहोचवा, असे आवाहन डॉ.फडके यांनी यावेळी केले. यावेळी अजय बोळे अशोक कांडेलकल यांनी मार्गदर्शन केले.


यांची होती उपस्थिती
या बैठकीला जिल्हा परीषद अध्यक्षा रंजना पाटील , भाजपाचे ज्येष्ठ सदस्य सुरेश धनके, जिल्हा परीषद सदस्य नंदकिशोर महाजन, कैलास सरोदे, अशोक कांडेलकर, जि.प.सदस्य नंदा पाटील, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष पद्माकर महाजन, अमोल पाटील, बाजार समिती सभापती श्रीकांत महाजन, भाजपा तालुकाध्यक्ष राजेंद्र लासूरकर, शिवाजीराव पाटील, माजी सभापती जितेंद्र पाटील, माजी उपसभापती सुनील पाटील, महेश चौधरी, पंचायत समिती सदस्य कविता कोळी, नगरसेवक यशवंत दलाल, महेश पाटील, गोपाळ नेमाडे, प्रल्हाद पाटील, प्रा.सी.एस.पाटील, रेखा बोंडे नितीन पाटील आदी भाजपा पदाधिकारी व लोकप्रतिनिधी उपस्थित होते
