एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मांचे आता ‘जयहिंद’ नव्हे ‘जय महाराष्ट्र’ !

मातोश्रीवर जावून बांधले सेनेचे शिवबंधन : नालासोपार्यातून उमेदवारीची शक्यता
मुंबई – एन्काऊंटर स्पेशालिस्ट अशी खास ओळख असलेले पोलीस अधिकारी प्रदीप शर्मा यांनी दोन महिन्यांपूर्वी दिलेला राजीनामा राज्याच्या गृह विभागाने मंजूर केल्यानंतर प्रदीप शर्मा यांचा राजकारणात जाण्याचा मार्ग जवळपास निश्चित झाला. शुक्रवारी सायंकाळी शर्मा यांनी मातोश्रीवर जावून शिवबंधन बांधले. ते आता नालासोपारा विधानसभा मतदार संघातून निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. प्रदीप शर्मा यांनी 4 जुलै रोजी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. राजीनाम्यानंतर प्रदीप शर्मा राजकारणात प्रवेश करणार असल्याची चर्चा होती. आता राज्याच्या गृह विभागाने राजीनामा मंजूर केल्यानंतर आगामी विधानसभा निवडणुकीत शिवसेनेच्या तिकीटावर प्रदीप शर्मा नालासोपारा मतदारसंघातून निवडणूक लढणार असल्याची माहिती आहे.




