भुसावळात महिलेवर बलात्कार : आरोपीच्या शोधार्थ पथके रवाना
भुसावळ : मध्यप्रदेशातील खरगोन जिल्ह्यातील रहिमपुरा येथील 35 वर्षीय महिला भुसावळातील एका महिलेशी नाजूक विषयावर झालेल्या वादानंतर उभयंतांनी पोलिस ठाणे गाठले मात्र पोलिस ठाण्याबाहेर पडताच 35 वर्षीय महिलेला अज्ञात आरोपीने लाल रंगाच्या दुचाकीवरून ट्रामा केअर सेंटरमागील निर्जनस्थळी नेत दोन वेळा अत्याचार केल्याची घटना सोमवारी रात्री साडेनऊ ते 11 दरम्यान घडली होती. या गंभीर घटनेनंतर पोलिस प्रशासनाने आरोपीच्या शोधार्थ पथके रवाना केल्याची माहित सूत्रांनी दिली.
अज्ञात तरुणाचा पोलिसांकडून कसून शोध
35 वर्षीय पीडीतेच्या फिर्यादीनुसार, पोलिस ठाण्यात गैरसमज दूर झाल्यानंतर तिच्या मुलाचा फोन आल्याने ती पोलिस ठाण्याबाहेर पडली असतानाच 25 ते 30 वर्षीय संशयीत आरोपी लाल रंगाच्या दुचाकीवर आला व त्याने भांडण झालेल्या महिलेने घरी बोलावण्याचे सांगत पीडीतेला दुचाकीवर बसवून ट्रामा केअर सेंटरमागील निर्जन जागी नेले व पीडीतेने आपल्या आलेल्या संकटाची भनक लागल्याने तिने दुचाकीवरून उडी मारल्यानंतर आरोपीने तिचा पाठलाग करीत तिला बेदम मारहाण करीत दोन वेळा अत्याचार केला व अत्याचारानंतर आरोपीने भला मोठा दगड पीडीतेच्या अंगावर टाकण्याचा प्रयत्न केला मात्र पीडीतेने वार चुकवल्याने तिचे प्राण वाचले व या नंतर आरोपी पसार झाला. त्यानंतर पीडीता पायी चालत महामार्गावर आली व तिने लोकांच्या मदतीने बाजारपेठ पोलिस ठाणे गाठले.

जिल्हा पोलिस अधीक्षकांची धाव
या घटनेची माहिती कळताच जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे, पोलिस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे, सहा.अधीक्षक अर्चित चांडक, शहरचे पोलिस निरीक्षक बाबासाहेब ठोंबे, तालुक्याचे निरीक्षक रामकृष्ण कुंभार, बाजारपेठ सहा.निरीक्षक अनिल मोरे आदींनी घटनास्थळी धाव घेतली. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपीचा शोध सुरू असल्याचे पोलिस अधीक्षक म्हणाले. या प्रकरणात नेमके कोण-कोण सहभागी आहे याबाबत खोलवर तपास सुरू असल्याने आत्ताचे काही सांगता येणार नसल्याचे डॉ.मुंढे म्हणाले. दरम्यान, पीडीतेच्या वर्णनावरून संशयीत आरोपीचा पोलिसांकडून शोध घेतला जात आहे शिवाय लाल रंगाच्या बाईकद्वारेही आरोपीपर्यंत पोलिस प्रशासनाचा पोहोचण्याचा प्रयत्न आहे.
