माजी महसूल मंत्री एकनाथराव खडसेंना दिलासा


भोसरी जमीन प्रकरणी आता पुढील सुनावणी 8 मार्च रोजी

मुंबई : माजी महसूल मंत्री एकनाथराव खडसे यांना हायकोर्टाकडून मोठा दिलासा मिळाला असून भोसरी जमीन प्रकरणी पुढील सुनावणी 8 मार्चला होणार आहे. 24 रोजी ही सुनावणी होणार असलीतरी काही कारणाने ती होवू शकली नाही. पुण्यातील भोसरीतील कथित जमीन गैरव्यवहार प्रकरणी एकनाथ खडसे यांची ईडीकडून चौकशी सुरू आहे. ईडीने बजावलेल्या समन्सप्रमाणे खडसे ईडीसमोर हजर झाल्यानंतर त्यांची अनेक तास चौकशी झाल्यानंतर त्यांना पुन्हा समन्स बजावण्यात आले मात्र त्यानंतर त्यांनी या कारवाईला आव्हान देणारी याचिका केली. खडसेंच्या याचिकेवर बुधवारी सुनावणी असलीतरी ती आज पूर्ण होऊ न शकल्यानं पुढील सुनावणी 8 मार्चला होणार असल्याने तो पर्यंत माजी मंत्री खडसेंना दिलासा मिळाला आहे.

 



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !