डॉक्टर मंदिरात अन् चोरटे घरात : 60 लाखांची घरफोडी


औरंगाबाद : शहरातील प्रतापनगर, उस्मानपुरा भागातील डॉक्टर दाम्पत्य देवदर्शनासाठी परराज्यात गेल्याची संधी चोरट्यांनी साधत बंगल्यातील तब्ब्ल शंभर तोळे सोन्यासह दहा लाखांची रोकड मिळून सुमारे 60 लाखांच्या ऐवजावर डल्ला मारला. बुधवारी सकाळी ही घटना उघडकीस आल्याने खळबळ उडाली. डॉ.सुषमा सोनी (रा.प्रतापनगर, उस्मानपुरा) आणि त्यांचे पती जयंत सोनी हे 8 दिवसापूर्वी परीवारासह देवदर्शनासाठी परराज्यात गेल्याने चोरट्यांनी संधी साधली. बुधवारी सकाळी सोनी कुटुंबाचा नोकर अंगणातील झाडांना पाणी घालण्यासाठी आणि साफसफाई साठी आले असता चोरी उघडकीस आली. या घटनेची माहिती मिळताच पोलिस आयुक्त डॉ.निखील गुप्ता, उपायुक्त निकेश खाटमोडे, उपायुक्त दीपक गिरर्‍हे आदी अधिकारी दाखल झाले आहेत.

 










मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !