प्रवाशांना सुखद दिलासा : भुसावळ-सुरत-नंदुरबारसाठी दररोज धावणार गाड्या
भुसावळ : रेल्वे प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी भुसावळ-बांद्रा टर्मिनस दरम्यान त्री साप्ताहिक तसेच भुसावळ-सुरत-नंदुरबार प्रतिदिन विशेष गाड्या चालविण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे
भुसावळ-बांद्रा टर्मिनस त्री साप्ताहिक विशेष गाडी
अप 09014 विशेष गाडी 7 मार्चपासून पुढील सूचना मिळेपर्यंत दर मंगळवार, गुरुवार, रविवारी भुसावळ येथून सायंकाळी 5.40 वाजता सुटल्यानंतर दुसर्या दिवशी सकाळी बांद्रा टर्मिनस येथे 4.30 वाजता पोहचेल.
डाऊन 09013 बांद्रा-भुसावळ गाडी 7 मार्चपासून पुढील सूचना मिळेपर्यंत दर मंगळवार, गुरुवार, रविवारी बांद्रा टर्मिनसहुन 12.20 वाजता सुटल्यानंतर त्याच दिवशी भुसावळला 12.00 वाजता पोहचेल.
या गाडीला जळगाव, धरणगाव, अमळनेर, नरडाणा, शिंदखेडा, दोंडाईचा, नंदुरबार, नवापूर, बारडोली, भेस्थान, नवसारी, बलसाड, पालघर, विरार, बोरीवली स्थानकावर थांबा देण्यात आला आहे. या गाडीला एक द्वितीय वातानुकूलित, दोन तृतीय वातानुकूलित, सहा शयनयान, सहा द्वितीय आसन श्रेणी बोगी जोडण्यात येतील.

सुरत जाणार्या खान्देशातील प्रवाशांना मोठा दिलासा
भुसावळ-सुत अप 09008 विशेष गाडी 2 मार्चपासून पुढील सूचना मिळेपर्यंत दररोज भुसावळहुन रात्री 8.20 वाजता सुटल्यानंतर दुसर्या दिवशी सकाळी सुरतला पहाटे सहा वाजता पोहोचणार आहे. सुरत-भुसावळ 09007 डाऊन विशेष गाडी 1 मार्चपासून पुढील सुचना मिळेस्तोवर सायंकाळी पाच वाजता सुरत येथून सुटल्यानंतर दुसर्या दिवशी भुसावळ दुपारी रात्री येथे 1.30 वाजता पोहोचेल. या गाडीला जळगाव, धरणगाव, अमळनेर,नरडाणा, शिंदखेडा, दोंडाईचा, नंदुरबार, खांडबारा, नवापूर, उकाई, सोनगढ, व्यारा, मढी, मॅन्ग्रोला, बारडोली, गंगाधरा, बागुमरा, चलथान, उधना या स्थानकावर थांबा देण्यात आला आहे. या गाडीला तीन स्लीपर, 12 द्वितीय आसन श्रेणी बोगी जोडण्यात येणार आहे.
भुसावळ-नंदुरबार दैनिक विशेष गाडी
भुसावळ-नंदुरबार अप 09078 अप विशेष गाडी 2 मार्चपासून पुढील सूचना मिळेस्तोवर दररोज भुसावळहुन 9.00 वाजता सुटल्यानंतर त्याचदिवशी नंदुरबार येथे 1.40 वाजता पोहोचेल.नंदुरबार-भुसावळ 09077 डाऊन गाडी 2 मार्चपासून पुढील सूचना मिळेस्तोवर 2.30 वाजता सुटल्यानंतर त्याच दिवशी भुसावळला सायंकाळी 7.20 वाजता पोहोचेल. या गाडीला जळगाव, पाळधी, चावलखेडा, धरणगाव, टाकरखेडा, अमळनेर, भोरटेक, पाडसे, बेटावद, नरडाणा, होल, शिंदखेडा, विखरण, दोंडाईचा, रनाळा, तिसी, चौपाले स्थानकावर थांबा देण्यात आला आहे. या गाडीला तीन स्लीपर, 12 द्वितीय आसन श्रेणी बोगी जोडण्यात येतील. सर्व आरक्षित विशेष गाड्या क्र.09014,
09008 आणि 09078 या विशेष गाड्यांचे बुकींग 27 फेब्रुवारीपासून सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रे व रेल्वे संकेतस्थळावर सुरू होणर आहे. केवळ आरक्षित तिकीट असलेल्या प्रवाशांना या गाड्यांमध्ये प्रवासाची परवानगी मिळेल शिवाय कोरोना नियमांचे पालन करावे लागणार आहे.
