पारोळ्यातील हवालदाराला लाच मागणी भोवली : पोलिस पाटील एसीबीच्या जाळ्यात


जळगाव : तक्रारदाराच्या भावाविरुद्ध पारोळा पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्यात तक्रारदारासह आई-वडिलांना गुन्ह्यात आरोपी न करण्यासह तक्रारदाराच्या भावाला जामीन मिळण्यासाठी 40 हजार लाचेची मागणी करून तडजोडीअंती 15 हजार रुपये निश्‍चित केल्यानंतर तातडीने लाचेची दहा हजारांची रक्कम आणून देण्याची मागणी 13 फेबु्रवारी रोजी केल्यानंतर पारोळा पोलिस ठाण्यातील हवालदार रवींद्र त्र्यंबक रावते (रा.किसान कॉलेजसमोर, पारोळा) व मंगळूर पोलिस पाटील प्रल्हाद पुंडलिक पाटील (रा.मंगरूळ, ता.पारोळा) यांनी लाच स्वीकारली नाही मात्र लाच मागणीबाबत एसीबीला अहवाल आल्यानंतर जळगाव एसीबीच्या पथकाने आरोपी प्रल्हाद पाटील यास गुरुवारी रात्री उशिरा अटक केल्याने खळबळ उडाली आहे.

हे देखील वाचा : प्रभारी सहाय्यक दुय्यम निबंधक एसीबीच्या जाळ्यात 

यांनी केली कारवाई
ही कारवाई पोलिस उपअधीक्षक सुनील कुराडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक प्रकाश झोडगे, पोलिस निरीक्षक मंजितसिंग चव्हाण, हवालदार जोहरे, नाईक संदीप सरग, संतोष हिरे, कृष्णकांत वाडीले, सुधीर सोनवणे, राजन कदम, भूषण खलाणेकर, प्रशांत चौधरी, सुधीर मोरे आदींच्या पथकाने केली.

पाच दिवसांपूर्वीच नाशिक एसीबीने केला होता सापळा यशस्वी
पारोळा ते अमळनेर प्रवासी वाहतूक करणार्‍या वाहन धारकावर कायदेशीर कारवाई न करण्यासाठी 300 रुपयांची लाच स्वीकारणार्‍या लाचखोर सहाय्यक फौजदार जगदीश विनायक पवार यांना नाशिक एसीबीच्या पथकाने शनिवारी सायंकाळी उशिरा लाच स्वीकारताच अटक केली होती. पाच दिवसांच्या अंतरातच पारोळा पोलिस ठाण्यात एसीबीच्या दुसर्‍यांदा कारवाई झाल्याने खळबळ उडाली आहे. नाशिक एसीबीचे पोलिस निरीक्षक उज्ज्वलकुमार पाटील, किरण रासकर, प्रकाश महाजन, गरूड, गांगुर्डे यांनी हा सापळा यशस्वी केला होता.

हे देखील वाचा : पारोळा पोलिस ठाण्यातील लाचखोर एएसआय नाशिक एसीबीच्या जाळ्यात 




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !