पाचोर्‍यातील लाचखोर प्रभारी सहाय्यक दुय्यम निबंधकाला एक दिवसाची कोठडी


जळगाव : पाचोरा न्यायालयात वारस दाखल्याचे प्रकरण दाखल करण्याकामी लोहारी, ता.पाचोरा येथील शेत मिळकती व घर मिळकतींच्या एकूण आठ उतार्‍यांचे मुल्यांकन दाखला मिळण्यासाठी अर्ज केल्यानंतर मूल्यांकन दाखला देण्याच्या मोबदल्यात 700 रुपयांची लाच स्वीकारणार्‍या पाचोरा दुय्यम निबंध कार्यालयातील प्रभारी सहाय्यक दुय्यम निबंधक ज्ञानदेव साहेबराव चव्हाण (46, रा.संभाजी नगर, पाण्याच्या टाकीजवळ, पाचोरा) यांना जळगाव एसीबीच्या पथकाने गुरुवारी सायंकाळी कार्यालयात अटक केली होती. शुक्रवारी आरोपीस न्यायालयात हजर केले असता त्यांना एक दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली. तपास जळगाव एसीबीच्या उपअधीक्षक गोपाल ठाकुर, निरीक्षक निलेश लोधी, निरीक्षक संजोग बच्छाव व सहकारी करीत आहेत.

हे पण वाचा : लाच मागणी प्रकरणी ‘त्या’ पोलिस पाटलाला 28 पर्यंत पोलिस कोठडी



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !