भुसावळात महिलेवर अत्याचार : आरोपी जाळ्यात
भुसावळ : मध्यप्रदेशातील खरगोन जिल्ह्यातील रहिमपुरा येथील 35 वर्षीय महिला भुसावळातील एका महिलेशी झालेल्या नाजूक विषयावर झालेल्या वादानंतर जाब विचारण्यासाठी सोमवारी दुपारी चार वाजता भुसावळात आल्यानंतर सोमवारी दुपारी बाजारपेठ पोलिस ठाण्यात हा वाद पोहोचला होता. उभयंतांमधील वादाची दरी पोलिसांनी मिटवत महिलेचा गैरसमज दूर केल्यानंतर 35 वर्षीय महिला पोलिस ठाण्याबाहेर पडली व दगडी पुलाकडे निघाली असतानाच 25 ते 30 वर्षीय तरुणाने भांडण झालेल्या महिलेने बोलावल्याचे सांगत दुचाकीवर बसवून निर्जन जागी नेत अत्याचार केल्याची धक्कादायक घटना सोमवारी रात्री 9.30 ते 11.30 दरम्यान घडली. अतिशय गुंतागुंतीचा व कुठलाही पुरावा नसताना पोलिस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी अभ्यासपूर्ण पद्धत्तीने गुन्ह्याचे विश्लेषण करीत हा गुणा सहा.पोलिस अधीक्षक अर्चित चांडक व बाजारपेठ व शहर पोलिसांच्या मदतीने उघडकीस आणला आहे. आरोपी भावेश कांतीलाल दंडगव्हाळ (28, शिव कॉलनी, रेल्वे दुनिया परीसर, भुसावळ) यास अटक करण्यात आली. आरोपीला न्यायालयाने पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.
यांनी आवळल्या आरोपीच्या मुसक्या
जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे, अपर पोलिस अधीक्षक चंद्रकांत गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे, सहा.अधीक्षक अर्चित चांडक, सहा.निरीक्षक अनिल मोरे, सहा.निरीक्षक मंगेश गोंटला, शहर वाहतूक शाखेचे सहा.निरीक्षक हनुमंत गायकवाड, शहरचे सहा.निरीक्षक संदीप दुनगहू, तालुक्याचे सहा.निरीक्षक रुपाली चव्हाण, गुन्हे शोध पथकाचे हवालदार जितू पाटील, अनिल पाटील, अयाज सैय्यद, रवींद्र बिर्हाडे, किशोर महाजन, उमाकांत पाटील, रमण सुरळकर, दीपक पाटील, गीता कश्यप, विकास सातदिवे, प्रशांत परदेशी, ईश्वर भालेराव, दिनेश कापडणे, योगेश माळी, परेश बिर्हाडे, जीवन कापडे, सचिन चौधरी, प्रशांत सोनार, आशा बावस्कर यांनी हा गुन्हा उघडकीस आला.

