यावलमध्ये गोवंश जातीचे चामडे जप्त : चौघे आरोपी जाळ्यात
यावल पोलिसांची भुसावळ विभागात आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई
यावल : हडकाई नदीपात्रात गोवंश जातीच्या चामड्यासह दोन ट्रक मिळून 14 लाख 93 हजार रुपयांचा मुद्देमाल शनिवारी यावल पोलिसांनी जप्त केला. या प्रकरणी चौघांना यावल पोलिसांनी अटक केली आहे. भुसावळ विभागातील ही सर्वात मोठी कारवाई मानली जात असून यावल पोलिस निरीक्षक सुधीर पाटील यांच्यासह सहकार्यांनी दाखवलेल्या धाडसी कारवाईचे सर्वत्र कौतुक हाते आहे.
गोपनीय माहितीवरून कारवाई
यावल पोलिस निरीक्षक सुधीर पाटील यांना गोपनीय माहिती मिळाल्यानंतर त्यांनी पोलिस उपनिरीक्षक् जितेंद्र खैरनार, हेड कॉन्स्टेबल असलम, पोलीस शिपाई सुशील घुगे, भूषण चव्हाण, राजेश वाडे आदींनी घटनास्थळी धाव घेत संशयीत आरोपी सय्यद सुभान सय्यद बिलाल (47, डांगपुरा, यावल), मोहम्मद इमरान मोहम्मद इकबाल (सुप्रीम कॉलनी, जळगाव), शेख चाँद शेख इजाजुल (पीलखाना शिवाजीनगर, हावडा कोलकाता)व नवाब आलम मेहबूब आलम (रा.पीलखाना शिवाजीनगर, हावडा कलकत्ता) यांना अटक करण्यात आली. आरोपींनी 27 रोजी दुपारी 12.15 वाजता यावल शहरातील हडकाई नदीचे पात्रात मालवाहू ट्रक (क्रमांक एम.एच.19 झेड. 0934) यामध्ये एकूण अंदाजे 165 गोवंश जातीचे चामडे आढळले तर दुसरा (डब्ल्यू.बी.11 डी.3686) मध्ये 300 गोवंश जातीचे चामडे आढळल्याने ते जप्त करण्यात आले. आरोपींविरुद्ध अंमलदार राहुल रतन चौधरी यांच्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला.

