पत्नीचे विवाहबाह्य संंबंध पाहताच प्रियकराची केली हत्या !
नवी दिल्ली : प्रियकरासोबत पत्नी नको त्या अवस्थेत दिसताच पतीने भावाच्या मदतीने प्रियकराची हत्या केल्याची घटना युपीतील कानपूर भागात घडल्याने खळबळ उडाली आहे. पोलिसांनी घटनास्थळावरून 4 जणांना अटक केली असून चौकशी करत आहे. आपल्या पत्नीसोबत प्रियकर आक्षेपार्ह स्थितीत दिसताच संतापात आरोपी पतीने आपल्या भावासोबत मिळून पत्नीच्या प्रियकराची दगड व विटांनी ठेचून हत्या केली. बदन सिंह असे मयताचे नाव आहे. अतिरिक्त एसपी घनश्याम तिवारी यांनी सांगितले की, 21 वर्षीय युवकाचा मृतदेह रसूलबाद पोलिस ठाण्याच्या लक्ष्मणपूर गावाजवळ सापडला. डोकं आणि गळ्यावर जखमा आढळून आल्या आहेत. यामध्ये दुसर्या गावच्या महिलेशी प्रेमसंबंधाची बाब समोर आली आहे.