म्हशीला पाणी पाजण्याचा वाद बेतला जीवावर
पौड : म्हशीला पाणी पाजण्यावरून झालेल्या वादात गोळीबार झाल्याने एकाचा मृत्यू झाल्याची घटना वाळेण येथे घडल्याने या परीसरात एकच खळबळ उडाली आहे. वाळेण येथे सोमवारी सायंकाळी चार वाजता अजय टाघु साठे (40) ही व्यक्ती म्हशींना पाणी पाजण्यासाठी गेली असता तेथे अजय व बापुलक्ष्मण जोटी (24, टा.डोंगरगाव) यांच्याबरोबर शाब्दीक वाद होवून अजयने बापुच्या कानशीलात मारली. याचा राग अनावर झाल्याने बापूने घरातील बंदुकीने अजयच्या छातीच्या डाव्या बाजूला गोळी झाडली.यात अजय जखमी झाला होता. त्याला पुढील उपचारासाठी हलविले असता रस्त्यातच त्याचा मृत्यू झाला. गोळीबारानंतर आरोपीला पौड पोलिसांनी जेरबंद केले आहे. हे कोणतेही गँगवॉर नसल्याचे पोलीस निरीक्षक अशोक धुमाळ यांनी सांगितले.