विभागीय लोकशाही दिनाचे 8 मार्च रोजी आयोजन
जळगाव : विभागीय महसूल आयुक्त कार्यालय, नाशिक येथे विभागीय लोकशाही दिन कार्यक्रमाचे आयोजन सोमवार, 8 मार्च 2021 रोजी सकाळी 11.00 वाजता करण्यात आले आहे. 8 मार्च 2021 रोजी होणार्या विभागीय लोकशाही दिनात अर्जदार यांचे अर्ज समक्ष, टपाल व ईमेलव्दारे स्विकारण्यात येणार आहे. सद्यःस्थितीत कोविड बाधीत रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे या कार्यक्रमास कोणत्याही विभागाचे अधिकारी यांनी उपस्थित राहण्याची आवश्यकता नाही, आपले विभागाशी संबधीत अर्ज प्राप्त झाल्यास त्याबाबत कार्यवाही करण्यासाठी पाठविण्यात येईल, असे उपायुक्त (महसुल) विभागीय आयुक्त कार्यालय, नाशिक गोरक्ष गाडीलकर यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.