भाजपाच्या बेजवाबदारपणाचा जळगावात महिला पदाधिकार्यांकडून निषेध
जळगाव : जळगाव शहरातील आशादीप वसतीगृहात झालेला प्रकार आज राज्यात सर्वत्र गाजत असून यामुळे जळगाव शहराची मोठी बदनामी होत आहे. भाजपाने याप्रकरणाची सत्यता व तपासणी करूनच विधीमंडळात हा विषय न मांडता तसेच भाजप विरोधी पक्ष नेत्यांनी विधानसभेत अत्यंत घाईघाईत संयम न बाळगता मुनगंटीवार व देवेंद्र फडणवीस यांनी जी विधाने केली त्यामुळे जळगाव शहराची बदनामी झाल्याने या प्रकाराचा महाविकास आघाडीच्या महिला पदाधिकार्यांनी आज उपजिल्हाधिकारी राहुल पाटील यांना दिलेल्या निवेदनाद्वारे निषेध केला आहे. आशादीप वस्तीगृह प्रकरणामुळे राज्यात जळगाव जिल्ह्याची बदनामी होत असून या प्रकरणाची सत्यता तपासणी करूनच भाजपाने हा विषय विधीमंडळात मांडायला हवा होता तसेच कोणतीही व्हिडीओ क्लिप नसतांना बेजबाबदार विधानाचा महाआघाडीच्या सरीता माळी-कोल्हे, राष्ट्रवादी काँग्रेस महिला जिल्हाध्यक्षा कल्पना पाटील यांनी निषेध केला आहे.







