अमरावती-तिरुपती विशेष गाडी रद्द


भुसावळ : रेल्वे प्रशासनातर्फे गुंटकल विभागांमध्ये तिरुपती स्टेशन येथे यार्ड रीमोल्डिंग, सिग्नलिंग तसेच विद्युतीकरणाचे कार्य केले जात असल्यामुळे काही विशेष गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. त्यातील भुसावळ विभागातील अमरावती-तिरुपती विशेष गाडी रद्द करण्यात आली आहे. डाऊन 02765 तिरुपती-अमरावती विशेष गाडी 6 व 9 मार्च प्रस्थान स्टेशन येथून रद्द करण्यात आली आहे. अप 02766 अमरावती-तिरुपती विशेष गाडी 8 व 11 मार्च रोजी प्रस्थान स्थानकापासून रद्द करण्यात आली आहे. रेल्वे प्रवाशांनी बदलाची नोंद घ्यावी, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !