मुकेश अंबानीच्या घराबाहेर सापडलेल्या स्कॉर्पिओचा मालकाचा मृतदेह आढळला


मुंबई : दक्षिण मुंबईतील अँटिलीया या प्रसिद्ध उद्योजक मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानासमोर सापडलेल्या स्कॉर्पिओचा मालक हिरेन मनसुख यांचा मृतदेह शुक्रवारी कळवा खाडीत आढळल्याने खळबळ उडाली आहे. पोलिसांच्या प्राथमिक तपासात मनसुख यांनी खाडीत उडी मारून आत्महत्या केल्याचा अंदाज आहे. मनसुख हे ठाण्यातील नौपाडा येथे राहत होते. आज शुक्रवारी 10.25 मिनिटांनी मनसुख यांचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. नौपाडा पोलिस ठाण्यात आज दुपारी मनसुख बेपत्ता असल्याची तक्रार कुटुंबीयांनी केली होती.

काचेवरील क्रमांकामुळे कारची पटली ओळख
लॉकडाऊनमुळे कार बरेच दिवस बंद होती. 17 फेब्रुवारी रोजी ऑपेरा हाउस येथे काम असल्याने त्यांनी कार दुरुस्त करून घेतली. दुपारच्या सुमारास ऐरोली ब्रिजपर्यंत पोहोचताच कारचे स्टेअरींग जाम झाल्यामुळे तेथीलच सर्विस रोडवर ती पार्क करून मनसुख पुढे निघून गेले. 18 फेब्रुवारी रोजी कार पार्क केलेल्या ठिकाणी गेल्यावर कार तेथे नसल्याने विक्रोळी पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली होती. स्कॉर्पिओ जुनी असल्यामुळे जुन्या वाहनाच्या काचेवरील कोपर्‍यात वाहनाचा क्रमांक टाकण्यात आला होता. आरोपींनी वाहनाची ओळख पटू नये म्हणून कारचा चेसिस आणि इंजीन क्रमांक घासला होता. पण, काचेवरील क्रमांकामुळे कारची ओळख पटली. तपासात ती चोरी झाल्याचे समजताच पोलिसांनी कार मालकाला ताब्यात घेत त्याच्याकडे चौकशी सुरू केली होती.









 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !