पोलिस पूत्राचा प्रताप : बंदुकीच्या धाकावर तरुणीचे अपहरण


जयपूर : पोलिस दलात हवालदार पदावर कार्यरत असलेल्या कर्मचार्‍याच्या मुलाने बंदुकीच्या धाकावर तरुणीचे अपहरण केले. जयपूरमधील किशनगंज हौसिंग बोर्डजवळ ही फिल्मीस्टाईल घटना घडली. आरोपी तरुणाने तरुणीच्या घरी जीप आणत नंतर पिस्तूल दाखवत तरुणीला ओढत बाहेर आणले असता पीडितेच्या आई-वडीलांनी विरोध केला असता या तरुणाने त्यांना मारहाण केली. त्यानंतर पीडितेला जीपमध्ये घालून पसार झाला. आरोपीने घराच्या बाहेर येऊन हवेत गोळीबार केला. दरम्यान पीडितेच्या आईने आरोप केला की, हेड कॉन्स्टेबलचा मुलगा सुनील याच्याविरोधात तक्रार घेऊन आम्ही अनेकदा पोलीस ठाण्यात गेलो मात्र तिथे आमचे कुणी ऐकून घेतले नाही.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !