एप्रिलपासून नवीन वाहनांना पुढील सीट्ससाठी एअरबॅग देणं बंधनकारक !
नवी दिल्ली : मोटार अपघातातांची वाढती संख्या पाहता रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार 1 एप्रिल 2021 पासून, तयार केलेल्या नवीन वाहनांना पुढील सीट्ससाठी एअरबॅग देणं आवश्यक असणार आहे. दरम्यान, नवीन नियम लागू झाल्याने वाहनांच्या किंमती कमीत कमी 5000-7000 रुपयांनी वाढतील असा अंदाज आहे. याआधी 29 डिसेंबर 2020 रोजी सरकारने सांगितले होते की, 1 एप्रिल 2021 पासून नवीन वाहनांसाठी आणि 1 जून 2021 पासून जुन्या वाहनांसाठी डबल एअरबॅग अनिवार्य करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जुन्या वाहनांमध्ये एअरबॅगची मुदत तीन महिन्यांनी वाढवून 31 ऑगस्ट 2021 पर्यंत करण्यात आली आहे. वाहनांमध्ये ड्रायव्हरसाठी आणि त्याच्या शेजारी बसलेल्या प्रवाशांसाठी एअरबॅग अनिवार्य करण्याबाबत राजपत्र अधिसूचना जारी करण्यात आली आहे.