भरधाव ट्रकची रीक्षाला धडक : पाच जण ठार


बीड : बीड-परळी रोडवर मोची-पिंपळगाव परीसरात सरकी वाहून नेणार्‍या भरधाव ट्रकने एका रीक्षाला धडक दिल्याने पाच जणांचा मृत्यू झाला. रविवारी सायंकाळी सातच्या सुमारास हा अपघात झाला. अपघात झाल्यानंतर ट्रकचालकाने घटनास्थळावरून पळ काढला व नंतर बीड ते वडवणी रोडवरील घोडका राजुरीजवळ एका दुचाकी व नंतर मालवाहू रीक्षाला धडक दिल्यानंतर ट्रक पलटी झाला. अपघातानंतर चालक पसार झाला तर या अपघातात अन्य दहा जण जखमी झाले.

यांचा झाला मृत्यू
ट्रक (क्र.एम.एच.09 सी.व्ही. 9644) ने रीक्षा (क्र.एम.एच.23-5694) ला धडक दिल्याने रीक्षातील तबसूम पठाण, रीहाण पठाण (13), शारो सत्तार पठाण, तमन्ना अबजान पठाण (8) व मदिना पठाण (सर्व रा. शाहूनगर, बीड ) यांचा मृत्यू झाला तर रीक्षा लक सिद्धार्थ शिंदे व त्याचा भाऊ अविनाश शिंदे (दोघे रा. ढेकणमोहा, ता. बीड) तसेच प्रवासी जाईबाई कदम (रा. काळवाडी), मुजीब कुरेशी, अश्विनी गोविंद पोकळे (रा. देवळा), गोरख खरचाडे हे दोघे गंभीर जखमी झाले आहेत. अपघातस्थळी बीड ग्रामीण पोलिसांनी धाव घेतली.









 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !