आधी केली मैत्री नंतर केला लॉजमध्ये अत्याचार
खामगाव : 31 वर्षीय युवतीशी मैत्रीतून सलगी वाढत तिला उसणे पैसे देण्याच्या बहाण्याने शेगाव येथे बोलावत लॉजवर अत्याचार केल्याप्रकरणी पारस येथील चेतन जामोदकर याच्याविरुद्ध शेगाव शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. एका शहरातील युवतीला 9 फेब्रुवारी रोजी उसणे पैसे देण्याच्या बहाण्याने शेगाव येथे बोलावण्यात आले व गेस्ट हाऊसमधील एका खोलीत नेऊन बळजबरीने तिच्याशी शारीरीक संबंध प्रस्थापित केले. तसेच याबाबत कुणाला काही सांगितल्यास बदनामी करण्याची व फोटो व्हायरल करण्याची धमकी दिली. याप्रकरणी तरुणीच्या तक्रारीवरुन पोलिसांनी गुन्हा दाखल केला.