प्रेमात अडसर ठरणार्‍या आईचा केला प्रेयसीच्या मदतीने खून !


पुणे : कर्ज घेतल्यावरुन एका व्यक्तीने आपल्या आईचा खून केल्याची तक्रार मुलाने दिल्यानंतर पोलिसांनी तपासचक्रे गतिमान केली मात्र तक्रारदार खोटे बोलत असल्याची बाब उघड झाली तर प्रेमात आई अडसर ठरत असल्याने मुलोच प्रेयसीच्या मदतीने खून केल्याची बाब उघड झाली. लोणी काळभोर पोलिसांनी मुलाला आणि त्याच्या प्रेयसीलाही बेड्या घातल्यात. विशाल राम वंजारी (19, रा.माने वस्ती, वढू खुर्द, तालुका- हवेली), नॅन्सी गॅब्रिअल डोंगरे (26) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत तर सुशीला राम वंजारी (वय 38,रा. माने वस्ती) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे.

प्रेयसीच्या मदतीने केला खून
विशालने पोलिसांना सांगितलं की, नॅन्सी आणि त्याचे प्रेमसंबंध होते, पण या नात्याला आई सुशीला वंजारी यांचा विरोध होता. घरातून पैसे चोरण्यावरुन त्याची आई त्याला अनेकदा ओरडायची. सोमवारी दुपारी घरातून 15 हजार 500 रुपये चोरल्यावरुन दोघांमध्ये मोठा वाद झाला आणि कडाक्याचे भांडण झाले. याचा राग मनात धरुन विशालने प्रेयसी नॅन्सी हिच्या मदतीने चाकूने वार करून आईचा खून केला. नंतर आईचा मृतदेह घराबाहेर आणून टाकला व खून झाल्याचा बनाव करत पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला पण पोलिसांनी हा डाव हाणून पाडला.










मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !