भीषण अपघातात आठ जणांचा जागीच मृत्यू
नवी दिल्ली : ट्रक व कारची धडक होवून तब्बल आठ जणांचा मृत्यू झाल्याची घटना उत्तर प्रदेशच्या आग्रामध्ये घडली. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून वेगाने बचावकार्य सुरू झाले आहे. जखमींना उपचारासाठी तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. तसेच शवविच्छेदनासाठी मृतदेह हलवण्यात आले. आग्रा येथील हायवेवर हा भीषण अपघात झाला. एत्मादपूर येथून येणारी एक कार डिव्हायडरला धडकून रस्त्याच्या दुसर्या बाजूला पडली. त्याचवेळी रामबाग येथून एक कंटेनर येत होता. याच दरम्यान या दोन्ही वाहनांची जोरदार धडक झाली. कारमध्ये अडकलेल्या प्रवाशांच्या ओरडण्याचा आवाज ऐकून स्थानिकांनी लगेचच घटनास्थळी धाव घेत त्यांना मदतीचा हात दिला.
दोनो गाड़ियां विपरीत दिशा में जा रही थीं। स्कार्पियो के हाईवे पर नियंत्रण खोकर डिवाइडर पार करके दूसरी तरफ आ जाने से यह दुर्घटना हुई। घायलों को इलाज के लिए अस्पताल भेजा गया है: SP आगरा https://t.co/5qH7PTUtQ1 pic.twitter.com/rIdQ2GkhGw
— ANI_HindiNews (@AHindinews) March 11, 2021

