शेतजमिनीत सापडले लाखोंचे घबाड : निलंबीत अधिकार्‍याला अटक


नवी दिल्ली : राष्ट्रीय सुरक्षा संस्थेने सांबा जिल्ह्यातील एका शेतातून तब्बल 91 लाख रुपये जप्त केले असून या प्रकरणी सीमा सुरक्षा दलातील निलंबित अधिकार्‍याला अटक करण्यात आली. जम्मू काश्मीरच्या हंदवाडा नार्को टेररीज्म प्रकरणात ही कारवाई करण्यात आली. ही धनसंपत्ती आरोपी रोमेश कुमारला ड्रग्स तस्करांनी दिली होती. रोमेश कुमार ज्यावेळी नार्को कंट्रोल ब्यूरो (एसीबी) सोबत काम करत होता, त्यावेळी दहशतवादी कृत्य करणार्‍या साखळीकडून त्याला ही रक्कम मिळाली. या रक्कमेला रोमेश कुमारने शेतजमिनीत 7 फूट खाली खड्डा करून सुरक्षित ठेवलं होते.

आरोपींच्या अटकेनंतर प्रकार उघड
विशेष म्हणजे, एनआयने 1 मार्च रोजी श्रीनगर आणि जम्मू येथून 5 आरोपींना अटक करून कोर्टासमोर उभं केले, एनआयएने या आरोपींना 15 दिवसांसाठी रीमांडमध्ये घेतलं, अटक केलेल्या आरोपींच्या चौकशीवेळी हा प्रकार उघडकीस आला.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !