भुसावळात कोम्बिंग : सूर्यवंशी बंधूंना अटक


भुसावळ : भुसावळात शनिवारी रात्री 12 वाजेनंतर पोलिसांनी अचानक कोम्बिंग राबवत हद्दपार वॉण्टेड चार आरोपींना अटक केली. वरणगाव पोलिस ठाण्यात दागिणे हिसकावल्याप्रकरणी दाखल असलेल्या गुन्ह्यात रीपाइं आठवले गटाचे जिल्हाध्यक्ष राजू सूर्यवंशी आणि त्यांचे बंधू आनंत भागवत सूर्यवंशी यांच्यासह लोहमार्ग पोलिसांना हव्या असलेल्या दोन आरोपींना अटक करण्यात आली.

सूर्यवंशी बंधूंविरुद्ध वरणगावात गुन्हा
पिस्तुलाचा धाक दाखवून व्याजाची वसुली करण्यासाठी धमकावण्यासह दागिने हिसकावल्याचा आरोप फिर्यादी संजय त्रिलोकनाथ खन्ना (वय 56, रा. साईनगर, दर्यापूर शिवार, वरणगाव फॅक्टरी) यांनी करीत वरणगाव पोलिसात सूर्यवंशी बंधूंविरुद्ध तक्रार दिल्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला असून या गुन्ह्यात दोघांना अटक करण्यात आली. संशयीतांना शनिवारी भुसावळ न्यायालयात हजर केल्यानंतर न्यायालयाने दोघांना 16 पर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली. पोलिस प्रशासनातर्फे पर्यवेक्षाधीन पोलिस उपअधीक्षक नितीन गणपुरे व सहा.निरीक्षक संदीपकुमार बोरसे यांनी बाजू मांडली तर संशयीत आरोपींतर्फे अ‍ॅड.जगदीश कापडे, अ‍ॅड.चरण सिंग, अ‍ॅड.मतीन अहमद यांनी युक्तीवाद केला.


कोम्बिंगमध्ये अशी झाली कारवाई
नॉन बेलेबल सहा वॉरंटची अंमलबजावणी
सहा हद्दपार आरोपींची चौकशी मात्र एकही शहरात आढळला नाही
58 समन्सची पोलिसांनी केली बजावणी
85 रेकॉर्डवरील गुन्हेगारांची तपासणी
मास्क न लावणार्‍या 36 नागरीकांवर दंडात्मक कारवाई
रात्री दहा वाजेनंतर विनाकारण बाहेर फिरणार्‍या व कागदपत्रे न बाळगणार्‍या 26 दुचाकीस्वारांवर दंडात्मक कारवाई

यांनी राबवले शहरात कोम्बिंग
पोलिस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांच्या नेतृत्वात बाजारपेठचे सहा.अधीक्षक अर्चित चांडक, बाजारपेठ पोलिस ठाण्यातील तीन सहाय्यक निरीक्षक तसेच 15 कर्मचारी, शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक बाबासाहेब ठोंबे तसेच दोन सहा.पोलिस निरीक्षक व 10 कर्मचारी तसेच लोहमार्ग पोलिस ठाण्याचे निरीक्षक सुरज सरडे यांच्यासह दोन अधिकारी व 10 कर्मचारी तसेच आरसीपीच्या दोन पथकांनी शहरातील विविध भागात कोम्बिंग ऑपरेशन राबवले. बाजारपेठ हद्दीत तीन तर शहर हद्दीत दोन पथकांद्वारे मोहिम राबवून गुन्हेगारांची झाडाझडती घेण्यात आली.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !