भुसावळात ऑक्टोबर महिन्यात लेवा पाटीदार समाजातर्फे वधू-वर मेळावा
भुसावळ- अखिल भारतीय लेवा पाटीदार युवक महासंघ भोरगाव व लेवा पाटीदार पंचायत विभाग, भुसावळ तसेच लेवा पाटीदार मित्र मंडळ, औरंगाबाद यांच्या संयुक्त विद्यमाने वधू-वर परीचय मेळाव्याचे आयोजन 6 ऑक्टोबर रोजी करण्यात आले आहे. या मेळाव्यात युवक-युवतींची संपुर्ण कौटुंबिक माहिती असलेली परीचय पुस्तिका प्रकाशीत केली जाणार आहे. त्याकरीता नाव नोंदणी केली जात आहे. नाव नोंदणीसाठी कल्पना रसवंती, शिवाजी कॉम्प्लेक्स, पुरुषोत्तम मेडिकल जामनेर रोड, जंगले अॅन्ड सन्स, मामा पानसेंटर जामनेर रोड येथे 25 सप्टेंबरपर्यंत ईच्छूकांनी नावे देण्याचे आवाहन शहराध्यक्ष देवा वाणी व भोरगाव लेवा पंचायतीचे सचिव डॉ.बाळू पाटील यांनी केले आहे.