धक्कादायक ! : मेहुणीवरच केला अत्याचार
अजमेर : पत्नीला चहा आणण्यासाठी पाठवून मेहुणीवर अत्याचार करण्यात आल्याची घटना अजमेरमध्ये घडली. या घटनेने पत्नीने थेट पोलिस ठाणे गाठत पतीविरोधात अत्याचाराची तक्रार नोंदवली. आरोपी पतीने पत्नीला चहा बनविण्यासाठी पाठवल्यानंतर आरोपीने पतीने लहान मेहुणीवरच अत्याचार केला. काही वेळात पत्नी आल्यानंतर तिच्या लक्षात हा प्रकार आल्यानंतर तिने पतीच्या थोबाडीत लगावत अलवरच्या पोलिसांमध्ये जाऊन तक्रार नोंदविली.
पसार आरोपीचा कसून शोध
मोठ्या बहिणीला छोट्या बहिणीने कुटुंबियांना घडलेला प्रकार नको सांगू असे सांगितले होते. तरीही तिने तिच्या वडिलांना घडलेला प्रकार सांगितला. यानंतर छोट्या बहिणीला न्याय देण्यासाठी मोठी बहिण पुन्हा अजमेरला आली आणि पोलिसांत तक्रार दिली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेत पीडीतेची वैद्यकीय चाचणी केली आहे. तसेच आरोपीचा शोधही सुरु केला असून त्याला लवकरात लवकर अटक करण्यात येईल, असेही पोलिसांनी सांगितले.

