दारू पिण्याचा वाद बेतला जीवावर


इचलकरंजी : दारू पिण्याच्या कारणावरून मित्रांनी आपल्या सहकार्‍याचा खून केल्याची घटना शांती नगर परीसरात 24 फेब्रुवारी रोजी घडली होती. या घटनेत अजय कांबळे (मूळ रा.मुंबई) याचा मृत्यू झाला होता. या खून प्रकरणी अक्षय रावसाहेब कमतनुरे (22, रा.कृष्णा नगर, गल्ली नंबर, 4 इचलकरंजी) व शक्ती शहाजी इंगळे (शहापूर, कामान चौकाजवळ, इचलकरजी) या दोघांसह एका अल्पवयीनाला ताब्यात घेण्यात आले आहे. दारू पिण्याच्या कारणावरून हा खून झाल्याचे उघडकीस आले आहे. अतिशय सूक्ष्म पद्धतीने तपास करून कोणताही पुरावा नसताना पोलिसांनी हे प्रकरण उघडकीस आणले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !