माजी कुलगुरू डॉ. सुधीर मेश्राम यांचे निधन
नागपूर : कवयित्री बहिणाबाई उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. सुधीर मेश्राम यांचे सामवारी नागपूर येथील अवंती हॉस्पिटलमध्ये उपचार घेतांना निधन झाले. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगावच्या विकासात डॉ. मेश्राम यांनी फार महत्तवपूर्ण भूमिका बजावली होती. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव येथे माजी राष्ट्रपती डॉ अब्दुल कलाम सरांना आणून डॉ.सुधीर मेश्राम यांनी विद्यापीठास नावलौकिक मिळवून दिला. भारत सरकारकडून संशोधन आणि विद्यार्थी हिताचे विभाग उभारण्यासाठी मोठा विकास निधी आणून विद्यापीठाचा मूलभूत विकास माजी कुलगूरू मेश्राम यांचे मोठे योगदान आहे. उत्तम संशोधक, कुशल प्रशासक, गरीब – दलित – ग्रामीण विद्यार्थ्यांचे कैवारी, धाडसी व्यक्तिमत्व, शिस्तप्रिय प्राध्यापक, चांगले मित्र म्हणून त्यांची ओळख होती. त्यांच्या पश्चात पत्नी व मुलगा असा परीवार आहे.