पिस्तुलाच्या धाकावर लूट : तिसरा आरोपीही जाळ्यात


जळगाव : पिस्तूलाच्या धाकावरील लूट प्रकरणी तिसर्‍या आरोपीलाही अटक करण्यात आली. अविनाश सुरेश माने (19, रा.दगडीचाळ, धुळे) असे अटक केलेल्या तिसर्‍या संशयहताचे नाव आहे. पंचमुखी हनुमान मंदीर परीसरात 15 लाख रुपये घेऊन जात असलेल्या एकाला पिस्तूलचा धाक दाखवत रक्कम लांबवण्याची घटना घडल्यानंतर दोन आरोपींना अटक करण्यात आली होती. यापूर्वी खुशाल उर्फ मनोज अशोक मोकळं व रितीक उर्फ दादु राजेंद्र राजपूत या दोघांना अटक केली होती. खुशाल व रितीक या दोघांनी 1 मार्च रोजी जळगाव शहरात महेश भावसार यांना अडवुन त्यांच्या ताब्यातील 15 लाख रुपयांची रोकड लांबवली होती. यानंतर दोघे धुळे, सुरत व उल्हासनगर येथे पळुन गेले होते. या दरम्यान, पोलिसांनी उल्हासनगर येथून दोघांना ताब्यात घेतले. तेव्हापासून ते एमआयडीसी पोलिसांच्या पोलीस कोठडीत आहेत. दरम्यानच्या काळात पोलिसांनी अधिक तपास केला असता या दोघांनी अविनाश माने याच्या मदतीने मालेगाव शहरात देखील अशाच प्रकारे गुन्हे केल्याची कबुली दिली. तसेच भावसार यांच्याकडून लांबवलेल्या पैशांपैकी काही रक्कम माने याच्याकडे ठेवल्याचेही सांगीतले. त्यानुसार एमआयडीसी पोलिसांनी मालेगाव येथे जाऊन माने यालाही ताब्यात घेतले. या तीघांच्या विरुद्ध धुळे, मालेगाव व नाशिक शहरात जबरी लुट, दरोड्यासारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !