धक्कादायक ! : अल्पवयीन तरुणीवर नऊ दिवस अत्याचार


कोटा : देशात अत्याचाराच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. अल्पवयीन 15 वर्षीय तरुणीवर 12 हून अधिक जणांनी तब्बल आठवडाभर अत्याचार केल्याची घटना राजस्थानच्या हाडौतीमध्ये धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणात आतापर्यंत 20 जणांना अटक करण्यात आली. या प्रकरणी चार अल्पवयीन आणि एका महिलेचा समावेश आहे.

फेब्रुवारी महिन्यात केला अत्याचार
कोटा ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक शरद चौधरींनी दिलेल्या माहितीनुसार हा प्रकार 25 फेब्रुवारी 2021 रोजी घडला. आरोपी चौथमल, बुलबुल उर्फ पूजा जैन पीडितेला बॅग देण्याच्या बहाण्यानं दुचाकीवरून शेजारच्या झालावाड जिल्ह्यात घेऊन गेले. त्यांनी तिथे तीन-चार मुलांना बोलावलं आणि पीडितेला त्यांच्याकडे सोपवलं. तिला पहिल्या दिवशी गागरोन किल्ल्यावर नेण्यात आलं. त्यानंतर झालावाडमधील एका खोलीत नेलं गेलं. तिथे तिच्यावर अनेकदा अत्याचार करण्यात आले, अशी माहिती चौधरींनी दिली.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !