भीषण आगीत 25 दुकाने खाक : लाखोंचे नुकसान
पुणे : तब्बल 25 दुकाने भीषण आगीत खाक झाल्याची घटना पुण्याच्या कॅम्प परीसरातील शिवाजी मार्केटमध्ये मंगळवारी पहाटेघडली. तासाभराच्या अथक प्रयत्नांनंतर अग्निशमन दलाच्या पथकाने आगीवर नियंत्रण मिळवले. पुण्यातील कॅम्प परीसरात छत्रपती शिवाजी मार्केट असून मंगळवारी पहाटे चार वाजण्याच्या सुमारास या मार्केटमध्ये एका दुकानात आग लागल्यानंतर आगीने रौद्र रूप धारण करीत नजीकच्या दुकानांनी पेट घेतला. या आगीत तब्बल पंचवीस दुकाने जळून भस्मसात झाली आहे. आगीत कोंबड्या आणि बकर्यांचा आगीत जळून मृत्यू झाला.