कबड्डी संघातील दोघे खेळाडू अपघातात ठार
वालचंदनगर : ट्रक आणि तवेरा वाहनात धडक झाल्यानंतर दोन कबड्डीपटुंचा मृत्यू झाला आहे तर दोघेजण गंभीर जखमी झाल्याची घटना बुधवारी पहाटे पाच वाजता विजापुरच्या पुढे 50 किमी अंतरावर घडली. कळंब येथील महाराणा कबड्डी संघातील ेखळाडू मंगळवारी रात्री एका स्पर्धेसाठी हुबळीच्या दिशेने निघाले असता क्रुर काळाने दोघांवर झडप घातली. मृत्युमुखी पडलेल्या आणि जखमी खेळाडुंची नावे समजु शकलेली नाहीत. गंभीर सर्व खेळाडूंना विजापूर येथील बंजारा हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणी कोल्हारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.