मुंबईच्या नूतन पोलिस आयुक्तपदी हेमंत नगराळे
पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांची उचलबांगडी !
मुंबई : मनसुख हिरेन मृत्यू प्रकरण आणि सहाय्यक पोलिस निरीक्षक सचिन वाझे यांच्या प्रकरणी महाविकास आघाडी सरकारविरुद्ध सातत्याने टिका सुरू असतानाच मुंबईचे पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांची बदली करण्यात आली असून त्यांच्या जागी राज्याचे प्रभारी पोलिस महासंचालक हेमंत नगराळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राज्याच्या पोलिस महासंचालकांचा पदभार रजनीश शेठ यांच्याकडे देण्यात आला असून परमबीर सिंग यांच्याकडे गृहरक्षक दलाचा पदभार दिल्याचे सांगितले जात आहे. विविध वृत्तवाहिन्या या संदर्भात दावा देखील करीत आहेत.
सरकारचा मोठा निर्णय
श्री हेमंत नगराळे होणार नवे मुंबई पोलीस आयुक्त
श्री रजनीश शेठ यांच्या कडे पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य या पदाचा अतिरिक्त कार्यभार
श्री संजय पांडे यांच्या कडे महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाची जवाबदारी
श्री परमवीर सिंह यांच्या कडे गृह रक्षक दलाची जवाबदारी— ANIL DESHMUKH (@AnilDeshmukhNCP) March 17, 2021
वर्दीचा मान यापुढेही राखला जाईल : संजय राऊत
मुंबई पोलिस आयुक्तांच्या बदलीनंतर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनीदेखील ट्वीट करीत मुंबई तसेच महाराष्ट्र पोलिस दलास नवे नेतृत्व मिळाले आहे. आपल्या पोलिस दलाची परंपरा महान आहे. एकाद्या वावटळीत पोलीस दलाची पडझड होईल या भ्रमात कोणीच राहू नये. खाकी वर्दीचा मान व शान यापुढील काळात अधिक हिमतीने व सचोटीने राखला जाईल हीच अपेक्षा, असल्याचे त्यांनी म्हटले आहे.







