कोरोनाचा कहर ! : सात रुग्णांचा मृत्यू : जळगाव जिल्ह्यात कोरोनाचे 996 रुग्ण आढळले
जिल्ह्यातील बाधीतांची संख्या पोहोचली 73 हजार 571 वर : एकाच दिवसात 532 रुग्णांची कोरोनावर मात : 24 तासात सात रुग्णांचा मृत्यू
जळगाव : जिल्ह्यात बुधवारी कोरोनाचे तब्बल 996 रुग्ण आढळले असून त्याबाबत प्रशासनाला सायंकाळी अहवाल प्राप्त झाला आहे तर आतापर्यंत कोरोनामुळे 1462 रुग्णांचा मृत्यू ओढवला. जिल्ह्यात आतापर्यंत 73 हजार 571 नागरीकांना कोरोनाची लागण झाली असून त्यातील 63 हजार 559 रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे तर बुधवारी एकाच दिवसात 532 रुग्णांनी कोरोनावर मात केली तर गेल्या 24 तासात सात रुग्णांचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. दरम्यान, कोरोना रुग्ण संख्येत वाढ होत असल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे.
बुधवारी या शहरात आढळले बाधीत
जळगाव शहर 217
जळगाव ग्रामीण 03
भुसावळ 42
अमळनेर 91
चोपडा 181
पाचोरा 65
भडगाव 19
धरणगाव 78
यावल 40
एरंडोल 55
जामनेर 60
रावेर 21
पारोळा 28
चाळीसगाव 59
मुक्ताईनगर 23
बोदवड 11
अन्य जिल्हा 03

24 तासात सात रुग्णांचा मृत्यू
गेल्या 24 तासात जिल्ह्यातील सात रुग्णांचा मृत्यू झाला. त्यात चोपडा तालुक्यातील 57 व 88 वर्षीय महिला, जळगाव शहरातील 65 वर्षीय महिला, भुसावळ तालुक्यातील 81 वर्षीय पुरूष, भडगाव तालुक्यातील 78 वर्षीय पुरूष, चाळीसगाव तालुक्यातील 71 वर्षीय पुरूष, अमळनेर तालुक्यातील 71 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला.
